आमची ओळख

My photo
बी.डी.डी वरळी, महाराष्ट्र, India

अधिक माहिती

Friday, 10 June 2011

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ३


 
इतर वेगळी शॉर्टकट्स

Right SHIFT  आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
   

Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी
   

Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
   

SHIFT  सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
   

NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी
   
   
टिप : नक्कीच तुम्हाला वर सांगितलेल्या काही गोष्टी कळल्या नसतील, पण तुम्ही वापरुन  तर बघा. बहूतेक तुमच्या उपयोगाच्या असू शकतात.

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स २

 
कि-बोर्ड वरील विंडोज बटणातील शॉर्टकट्स
 

Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

Windows Logo + BREAK : 'System Properties' सुरु करण्यासाठी

Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी

Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी

Windows Logo + E : 'My Computer' सुरु करण्यासाठी

Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी

Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी

Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी

Windows Logo + U : 'Utility Manager' सुरु करण्यासाठी
 

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स १


 
 
सर्वसामान्य शॉर्टकट्स
 

CTRL+C : कॉपी

CTRL+X : कट

CTRL+V : पेस्ट

CTRL+Z : अनडू

DELETE : डिलिट

SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी

F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी

SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी

CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी

F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी

CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी

ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी

ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये  उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी

SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट

CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी

F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी

ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी

CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी
 








































मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या गोष्टी



मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सर्रास वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. असे असले तरी या सॉफ्टवेअर मधिल बऱ्याच गोष्टी सर्वांना माहित नसतात ज्या काम करताना उपयोगी पडू शकतात. इतकेच नाही तर आपले काम अधिक सोपे आणि लवकर होऊ शकते.
१) काही वेळेस अशी गरज पडते की आपण इंग्रजी मध्ये टाईप केलेले वर्ड मधिल काही भाग अथवा संपूर्ण फाईल मधिल काम आपणास बदलून इंग्रजीत कॅपिटल अथवा स्मॉल [ Capital or Small characters ] अक्षरांमध्ये करुन हवे असते. अशा वेळेस आपणास जो परिच्छेद हवा असेल तो सिलेक्ट करुन बटनांच्या वरील मेनू बार मधिल फॉरमॅट [ Format ] विभागातील चेंज केस [ Change Case ] वर क्लिक करा. आता इथे समोर येणाऱ्या चौकोनामध्ये आपणास आपले काम कोणत्या प्रकारामध्ये हवे आहे ते निवडून खालील 'OK' वर क्लिक केल्यास त्याप्रमाणे आपणास आपले काम कॅपिटल अथवा स्मॉल अक्षरामध्ये बदलता येते.

२) हेडर आणि फुटर Header and Footer :- बऱ्याच वेळेस अशी गरज पडते की वर्ड मध्ये एखाद्या फाईलमध्ये काम करताना त्यातील प्रत्येक पानाच्या वर आणि खाली काहीतरी गोष्ट सतत हवी असते. जसे एखादी फाईल जर कंपनी पत्राप्रमाणे [ Letterhead ] हवी असल्यास त्या फाईलच्या प्रत्येक पानाच्या वर आपणास त्या कंपनीचे नाव द्यावे लागते, तसेच प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस पान क्रमांक अथवा दिनांक हवा असतो.
अशा प्रकारे प्रत्येक पानाच्या वर आणि खाली काही गोष्टी सतत द्याव्या लागत असतील तर त्यासाठी बटनांच्या वरील मेनूबार मधिल [ View ] विभागातील [ Header and Footer ] वर क्लिक करावे. आता लगेच पानाच्या वरच्या बाजूस एक चौकोन तयार होऊन त्यामध्ये कर्सर असेल. या जागेमध्ये आपण पानाच्या वरच्या बाजूस जे हवे ते द्यावे तर समोर आलेल्या [ Header and Footer ] च्या चौकोना मधिल बटने वापरुन त्याजागी पान क्रमांक, दिनांक अथवा वेळ देऊ शकतो. त्यानंतर [ Footer ] म्हणजेच पानाच्या खालील जागी जाण्यासाठी असलेल्या त्या चौकोनातील [ Switch Between Header and Footer ] बटनावर क्लिक केल्यास आपल्या समोर पानाच्या खालच्या बाजूची जागा दिसते. या ठिकाणी आपण आपणास प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस जे हवे ते द्यावे अथवा बटनाद्वारे निवडावे. आपले काम झाल्यास त्या चौकोनातील [ Close ] ह्या बटनावर क्लिक केल्यास तो चौकोन बंद होतो.
अशा प्रकारे आपल्या फाईलमध्ये [ Header and Footer ] दिसल्यावर ते प्रत्येक पानाला लागू होते. प्रत्येक वेळेस पानाच्या वर आणि खाली सतत टाईप करावे लागणारे कमी होऊन वेळ वाचतो.

३) फुल स्क्रिन [ Full Screen ] : तसे पाहता वर्ड मध्ये काम करताना जिथे आपण टाईप करतो ती काम करायची जागा पुरेशी आहे. वरच्या बाजूस असलेली बटनांनी व्यापलेली जागा त्या मानाने फारच कमी आहे, तरी देखिल एखाद्या वेळेस काम करताना आपणास जर आपल्या कामाव्यतिरीक्त इतर कुठल्याही गोष्टी दिसू नये असे वाटत असल्यास बटनांच्या वर असलेल्या मेनूबार मधिल [ View ] विभागातील [ Full Screen ] वर क्लिक केल्यास इतर सर्व गोष्टी बंद होऊन आपली चालू फाईल समोर दिसते. त्या सोबत स्क्रिनवर [ Full Screen ] बंद करण्यासाठी चे बटन असते. त्यावर क्लिक केल्यास पुन्हा पुर्ववत स्थितीमध्ये आपले पान दिसू लागते.

४) एखादे वाक्य अथवा गोष्ट कॉपी [ Copy ] केली ती कॉम्प्युटरच्या डोक्यामध्ये तात्पुरती साठवली जाते आणि पेस्ट [ Paste ] केल्यानंतर कॉपी केलेली गोष्ट तशीच्या तशी तिथे उमटते. त्यानंतर दुसरी एखादी गोष्ट कॉपी केल्यास आधी कॉपी केलेली गोष्ट कॉम्प्युटरच्या डोक्यातून निघून जाते व नंतर पुन्हा पेस्ट केल्यास फक्त शेवटी कॉपी केलेलीच गोष्ट उमटते, हे सर्वांना माहित असते.
परंतु मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये यासाठी एक चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण जसजसे एक - एक गोष्ट कॉपी करत जाता तसतसे कॉम्प्युटर त्याच्या डोक्यातून आधी कॉपी केलेल्या गोष्टी काढून टाकतो व शेवटी कॉपी केलेली गोष्ट डोक्यात ठेवतो त्या ऐवजी वर्ड मधिल या महत्वाच्या व्यवस्थेमूळे वर्ड सॉफ्टवेअर आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी डोक्यात साठवत जातो.
[ Edit ] विभागातील [ Office Clipboard ] या नावावर क्लिक केल्यास पानाच्या उजव्या बाजूस एक रकाना सुरु करतो. त्यामध्ये आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी असतात. आपणास जेव्हा जो शब्द हवा असेल तेव्हा त्या ( आधी कॉपी केलेल्या ) शब्दावर क्लिक केल्यास तो शब्द अथवा वाक्य पानावर उमटते.

५) वर्डमध्ये आपल्या फाईलमध्ये एखादे चित्र [ Photo / Image ] आणायचे असेल तर बटनांच्या वरील मेनूबार मधिल [ Insert ] ह्या विभागातील [ Picture ] या उपविभागामध्ये [ From File ] वर क्लिक करा. यामुळे आपणा समोर येणाऱ्या चौकोनात कॉम्प्युटर आपले चित्र निवडायला सांगेल. तुम्ही हव्या असलेल्या फोल्डरमध्ये जाऊन ते चित्र सिलेक्ट करायचे व नंतर त्या चौकोनातील [ Insert ] ह्या बटनावर क्लिक केल्यास ते चित्र आपल्या चालू फाईलमध्ये येते.
आपल्या फाईलमध्ये चित्राप्रमाणे आपण इतरही अनेक गोष्टी आणू शकतो. जसे तक्ता, आलेख, चिन्हे इ. इ. त्या व इतर अशा अनेक गोष्टी आणण्यासाठी वर सांगितलेल्या [ Picture ] ह्या उपविभागामध्येच त्यांची अधिक बटने सापडतील.

६) आपल्या चालू फाईलच्या मागच्या बाजूस एखादा रंग अथवा एखादी छानशी डिझाईन द्यायची असल्यास बटनांच्या वरील मेनूबार मधिल Format विभागातील Background वर क्लिक केल्यास बाजूला रंगांचा एक चौकोन येतो, त्यातील आपणास हवा असलेला रंग निवडल्यास तो रंग चालू फाईलीच्या येतो. त्याच विभागात More Colors आणि Fill Effects द्वारे इतर अनेक रंग तसेच रंगाच्या विविध छटा देवू शकतो.

चॅटींग म्हणजे काय व चॅटींग कशी करावी ?

 
इतरांशी केलेल्या गप्पांगोष्टींना चॅटींग अथवा चॅट म्हटले जाते.  इंटरनेटद्वारे कॉम्प्युटरवरुन केलेली चॅटींग हा त्यातलाच एक प्रकार. पण इथे दोन व्यक्ती समोरासमोर गप्पांगोष्टी न कराता जगभरातून कुठूनही गप्पांगोष्टी करु शकतात. या चॅटींगची महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा खर्च वगळता या चॅटींगला इतर कुठलाही अधिक खर्च येत नाही, थोडक्यात ही सेवा मोफत आहे.
चॅटींगसाठी असलेल्या प्रोग्रामला ' मॅसेंजर ( Messanger ) ' असे म्हणतात.
सध्या बर्‍याच वेबसाईट वरुन चॅटींगसाठी करण्यासाठी प्रोग्राम मोफत दिला जातो. त्यातील याहू, हॉटमेल, रिडिफ आणि जी-मेल यांचे ' मॅसेंजर ' जास्त प्रसिद्ध आहेत. सहाजिकच या वेबसाईटवरील मॅसेंजर वापरताना आपण त्यांचे सभासद असणे आवश्यक असते आणि त्यांची मेंबरशीप म्हणजेच सभासदसेवा देखिल मोफत आहे हे तुम्हाला माहित असेलच.
जसे तुम्हाला जर एखाद्याला फोन करायचा असेल तर दोन गोष्टी आवश्यक आहेत त्या म्हणजे तुम्हा दोघांकडे फोन असणे आणि तुम्हाला दुसर्‍याचा फोन नंबर माहित असणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे कॉम्प्युटरवरुन चॅटींग करण्यासाठी देखिल काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे. १)  दोघांकडे कॉम्प्युटरवर इंटरनेट असणे २) दोघांकडे एकाच प्रकारचा चॅटींगचा प्रोग्राम म्हणजे मॅसेंजर असणे ३) ज्या प्रकारचा मॅसेंजर तुमच्याकडे असेल त्या वेबसाईटची तुमची मेंबरशीप असणे म्हणजेच त्यांचा ई-मेल असणे आवश्यक आहे. जसे तुम्ही जर याहू चा मॅसेंजर वापरत असाल तर तुमचा याहूचा ई-मेल असणे आवश्यक आहे ४) तसेच दोघांनाही एकमेकांचा ई-मेल पत्ता माहित असणे आवश्यक आहे.
चॅटींगचा प्रोग्राम कसा लोड करावा.
१) आपणास ज्या प्रकारचा मॅसेंजर हवा आहे त्या मॅसेंजरच्या वेबसाईटवर जावून त्यांचा मोफत मॅसेंजर डाऊनलोड करावा.
याहूचा मॅसेंजर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मायक्रोसॉफ्टचा एम.एस.एन. मॅसेंजर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
रिडीफचा बोल मॅसेंजर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
जी-मेलचा जी-टॉक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
२) एखादा मॅसेंजर  वेबसाईटवरुनच आपोआप लोड करण्याची सोय असते तर काही मॅसेंजर  डाऊनलोड करुन स्वतःहून लोड करण्यासाठी आपल्या  कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करुन मग लोड करण्याचीपण सोय असते.
३) मॅसेंजर लोड करायचा प्रोग्राम सुरु झाला की त्यांनी सांगितल्याप्रमाणे  ' Accept '  अथवा  ' Next '  ह्या बटणांवर क्लिक करुन शेवटी ' Finish ' या प्रमाणे त्यांच्या सुचनांप्रमाणे क्लिक करुन मॅसेंजर लोड करायचा.
४) कुठलाही मॅसेंजर कॉम्प्युटरमध्ये लोड केला की विंडोजमधिल स्टार्ट बटणाच्या विरुद्ध कोपर्‍यातील चौकोनात त्याचे छोटे चित्र येते.  तसेच चॅटींगचा प्रोग्राम देखिल उजव्या कोपर्‍यात सुरु होतो.
५) त्या मॅसेंजरमध्ये तो मॅसेंजर ज्या वेबसाईटचा आहे त्याचा ई-मेल मधिल  ' उजर आयडी ( User ID ) '  म्हणजेच जर तुम्ही याहूचा मॅसेंजर लोड केला असेल तर त्यामध्ये तुमचा याहूचा  ' User ID ' उदा. तुमचा ई-मेल sagarkobnak@gmail.com असेल तर या तुमचा 'sagarkobnak'  हा User ID  टाकायचा. तसेच त्याखाली त्या ई-मेलचा पासवर्ड द्यायचा आणि खालिल ' Sign In ' ह्या बटणावर क्लिक करायचे की लगेच याहू मॅसेंजर तुमच्या नावाने सुरु होईल.
 चॅटींग कशी करावी ?
तुम्ही जर एखाद्या मॅसेंजरवरुन कधीच चॅटींग केली नसेल तर जेव्हा तुम्ही तो मॅसेंजर नविनच चालू करता तेव्हा तामध्ये कुणाचेच नाव नसते.
१) चॅटींग करण्यासाठी मॅसेंजरमध्ये दुसर्‍या व्यक्तीची नोंद असणे आवश्यक आहे.
२) दुसर्‍या व्यक्तीची नोंद आपल्या मॅसेंजरमध्ये करण्यासाठी त्यामध्ये ' Add '  अथवा ' Add Contact '  अशी सोय असते. त्यावर क्लिक करुन आपण ज्या व्यक्तीला आपल्या मॅसेंजरमध्ये नोंदवू इच्छीता त्याचा ई-मेल पत्ता अथवा User ID  टाकायचा व त्या व्यक्तीला मॅसेंजरमध्ये जमा करायचे. असे केल्याने तुमची त्या व्यक्तीच्या मॅसेंजर झळकते मग त्या व्यक्तीने जर मान्यता दिली तरच त्याचे नाव तुमच्या मॅसेंजरमध्ये जमा होते.
३) जर त्या दुसर्‍या व्यक्तीची मान्यता मिळून त्याचे नाव तुमच्या मॅसेंजरमध्ये जमा कि मगच तुम्ही त्याच्याशी चॅटींग करु शकता.
टिप : तुम्ही तुमच्या कितीही मित्रांना तुमच्या मॅसेंजरमध्ये जमा करु शकता.
४) पून्हा इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहीजे ती म्हणजे जर तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर चॅटींग करायची असेल तर ती व्यक्ती देखिल त्यावेळी मॅसेंजरवर उपलब्ध असली पाहिजे. जसे तुम्ही एखाद्याला फोन केला तर तुम्हाला हवी असलेली व्यक्ती फोनच्या जवळ असेल तरच तुम्ही तीच्याशी बोलू शकता.
५) तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर चॅटींग करायची असेल ती व्यक्ती अथवा ज्या व्यक्ती मॅसेंजरवर उपलब्ध आहेत म्हणजेच ज्या व्यक्तीचा मॅसेंजर चालू असेल त्यांच्या समोर ' ऑनलाईन '  अथवा ' ऑफलाईन '  किंवा   अथवा   असे चित्र दिसेल.
टिप : 'ऑनलाईन' चा अर्थ ती व्यक्ती त्यावेळी मॅसेंजरवर उपलब्ध आहे. तर 'ऑफलाईन' चा अर्थ ती व्यक्ती त्यावेळी मॅसेंजरवर उपलब्ध नाही.
६) जी व्यक्ती 'ऑनलाईन'  आपण तीच्याशी चॅटींग करु शकता त्यासाठी त्याव्यक्तीच्या नावावर क्लिक करुन येणार्‍या चौकोनामध्ये आपणास जे बोलायचे असेल ते टाईप करुन कि-बोर्ड वरील एंटर बटण दाबल्यास आपण टाईप केलेला संदेश त्या व्यक्तीच्या समोर येतो. त्याच चौकोनामध्ये पून्हा टाईप करुन ती व्यक्ती आपणाशी गप्पा मारु शकते. तसेच जी व्यक्ती मॅसेंजरवर त्यावेळी उपलब्ध नाही तीच्या नावावर क्लिक करुन आपण एखादा संदेश दिल्यास ती व्यक्ती जेव्हा तीचा मॅसेंजर सुरु करेल तेव्हा आपला संदेश तीला मिळेल.

मॅसेंजरद्वारे चॅटींग करणे ही फारच सोपी गोष्ट आहे. तुम्ही सुरुवात तर करा, तुम्हाला अजूनही कितीतरी माहिती कळेल.

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर

 अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरची मेमरी आणि कॉम्प्युटरमधिल संपूर्ण हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क यामध्ये व्हायरस शोधण्याचे काम करतो. या शोधण्यामध्ये त्याला व्हायरस सापडल्यास तो साफ (Clean), नष्ट (Delete), बंदिस्थ (Quarantine) करण्याची सुविधा अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये असते. सध्या बरेच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत तरीही त्यातील नॉर्टन (Norton) आणि मॅकॅफी (McAfee) हे दोन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
कॉम्प्युटर व्हायरस
 
व्हायरस म्हणजे विषाणू. ज्याप्रमाणे हानिकारक डासांद्वारे आपल्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रसार होवून एखादी व्यक्ती आजारी पडते त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये असलेल्या हानिकारक/अनावश्यक प्रोग्राममूळे कॉम्प्युटरमधिल व्यवस्थित चालणार्‍या प्रोग्राम्सना आणि कॉम्प्युटरच्या स्वतःच्या फाईली जाणूनबुजून खराब केल्या जातात. परिणामी चांगला चालणारा कॉम्प्युटर बिघडतो.
कॉम्प्युटर व्हायरस बनविणारी व्यक्ती नक्किच विकृत बुद्धिची असते, यात वाद नाही. कारण मुळात इतरांना त्रास देवून आनंदी होणारी व्यक्ती चांगली असूच शकत नाही.
सर्वच व्हायरस आपला कॉम्प्युटर बिघडवितात असे नाही. तर प्रत्येक व्हायरस हा तो बनविणार्‍या (विकृत बुद्धिच्या) प्रोग्रामरने सांगितलेल्या सुचनेप्रमाणे काम करतो. एकेकाळी व्हायरस म्हणजे कॉम्प्युटर बिघडविणारा प्रोग्राम असा समज होता. सध्याच्या काळातील व्हायरस हा निरनिराळ्या प्रकारे काम करतो. फक्त इतरांचे कॉम्प्युटर बिघडविणे या व्यतिरीक्त त्यांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरणे, एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करणे, क्रेडीट कार्डची माहिती शोधून ती पाठविणे, पासवर्ड शोधणे. इ. अशा प्रकारे इतरांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरुन तो व्हायरस बनविणारा प्रोग्रामर त्याचा काय उपयोग करीत असेल हे सांगण्याची गरज नाही.
कॉम्प्युटर व्हायरस हा तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागला जातो.
१. व्हायरस (Viruses)
२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses)
३. वर्म (Worms)

१. व्हायरस (Viruses) : म्हणजे एखाद्या प्रोग्रामरने बनविलेला असा एखादा छोटासा प्रोग्राम अथवा प्रोग्रामचा छोटासा भाग ज्याचा उद्देश दुसर्‍याच्या कॉम्प्युटरमधिल फाईली खराब करुन कॉम्प्युटरला बिघडविणे हा असतो.
२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरमधिल एखाद्या अथवा सर्वच सॉफ्टवेअर तसेच इतर ऍप्लिकेशन्सना इजा पोहचविणे या विध्वंसक उद्देशाने बनविला जातो.
३. वर्म (Worms) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरच्या मेमरीला इजा पोहचविण्याचे तसेच कॉम्प्युटरमधिल गोष्टींची/फाईलींची स्वतःहून अनावश्यक अनेक डुप्लीकेट फाईलींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने बनविला जातो.
सध्या प्रामुख्याने एखाद्या गोष्टीच्या (एखाद्य सोफ्टवेअरच्या, वेबसाईटच्या, वस्तुच्या, औषधाच्या) जाहिरातीसाठी या वरील तीन व्हायरसच्या प्रकारांचा उपयोग केला जातो.
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरची मेमरी आणि कॉम्प्युटरमधिल संपूर्ण हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क यामध्ये व्हायरस शोधण्याचे काम करतो. या शोधण्यामध्ये त्याला व्हायरस सापडल्यास तो साफ (Clean), नष्ट (Delete), बंदिस्थ (Quarantine) करण्याची सुविधा अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये असते. सध्या बरेच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत तरीही त्यातील नॉर्टन (Norton) आणि मॅकॅफी (McAfee) हे दोन अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.

अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काम कसे करते ?
 
अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल सर्व फाईल्समधिल प्रोग्राम चाळून त्यामध्ये इतर फाईलींना खराब करणारा अथवा आपणहून इतर फाईलींमध्ये शिरणारा प्रोग्राम असल्याची सुचना असलेल्या फाईली शोधण्याचे काम करते. एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शोधण्याच्या प्रकारामध्ये दोन विभाग पडतात. १) तंतोतंत नावाने शोध २) व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध. या दोन प्रकारातील व्हायरस सदृश प्रोग्रामचा शोध हा प्रकार जास्त प्रभावशाली असतो कारण मुळात एखाद्या फाईलचे नाव आणि स्वरुप काहीही असो त्यातील प्रोग्राममधिल कृती व्हायरसप्रमाणे आहे का या गोष्टीचा शोध या प्रकारामध्ये घेतला जातो.
एखादे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधिल व्हायरस शोधण्यात कितीही कार्यक्षम आणि प्रभावी असले तरी व्हायरस बनविणारे देखिल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा अभ्यास करत असतात आणि कुठल्याही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येणार नाही नविन वेगळा आणि उपद्रवी व्हायरस बनवितात. अशावेळी नविन व्हायरस जुन्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरला शोधता येत नाही व तो व्हायरस खुशाल त्या कॉम्प्युटरमध्ये आपले काम करत राहतो.
ज्याप्रमाणे कुठल्याही औषधाची एक अंतिम मुदत (Expire Date) असते त्याच प्रमाणे कुठलेही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर काही महिन्यानी थोडेफार कमकुवत बनते म्हणजेच नविन आलेल्या व्हायरसला ते शोधू शकत नाही. म्हणूनच या जुन्या झालेल्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर्सना वेळोवेळी अद्ययावत (Upgrade/Update) करणे आवश्यक असते. सध्या सर्वच अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर बनविणार्‍या कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअरसाठी वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर नविन व्हायरस शोधण्यासाठीचे व त्यांचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे प्रोग्राम मोफत देतात.
कॉम्प्युटर व्हायरसला आळा कसा घालावा ?
 
१. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपल्या कॉम्प्युटरला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने संपूर्ण स्कॅन करुन घ्यावे.
२. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपण जो अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरता तो त्या कंपनीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अथवा अपडेशनचा पॅच डाऊनलोड करुन अद्ययावत करावा.
३. दुसर्‍यांच्या कॉम्प्युटरमधिल कुठलीही फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी करण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
४. ईमेलद्वारे आलेल्या कुठल्याही फाईलीली डाऊनलोड करुन उघडून पहाण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
५. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ऑटो अनेबल मोडवर ठेवावे म्हणजेच ते आपणहून व्हायरस शोधण्याचे काम दरवेळी करीत राहील म्हणजेच कुठलाही व्हायरस सापडल्यास अथवा आढळल्यास त्वरीत त्याची सुचना तो देतो.
कॉम्प्युटर व्हायरसला आळा कसा घालावा ?
 
१. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपल्या कॉम्प्युटरला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने संपूर्ण स्कॅन करुन घ्यावे.
२. दर पंधरादिवसांनी / महिन्याला आपण जो अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरता तो त्या कंपनीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अथवा अपडेशनचा पॅच डाऊनलोड करुन अद्ययावत करावा.
३. दुसर्‍यांच्या कॉम्प्युटरमधिल कुठलीही फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये कॉपी करण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
४. ईमेलद्वारे आलेल्या कुठल्याही फाईलीली डाऊनलोड करुन उघडून पहाण्यापुर्वी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरद्वारे त्या फाईलमध्ये व्हायरस आहे का ते पहावे.
५. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ऑटो अनेबल मोडवर ठेवावे म्हणजेच ते आपणहून व्हायरस शोधण्याचे काम दरवेळी करीत राहील म्हणजेच कुठलाही व्हायरस सापडल्यास अथवा आढळल्यास त्वरीत त्याची सुचना तो देतो.

शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?



कॉम्प्युटरमध्ये आपल्या सर्व फाईल्स निरनिराळ्या फोल्डर्समध्ये ठेवलेल्या असतात. तसेच आपल्या फाईल्स व्यवस्थित रहाव्यात व लवकर मिळाव्यात म्हणून आपण त्या निरनिराळ्या फोल्डर्समध्ये आणि कॉम्प्युटरमधल्या निरनिराळ्या ड्राईव्ह मध्ये ठेवतो. उदा. (C:) , (D:) , (E:)  इ.
मग एखादी फाईल आपणास उघडायची असल्यास आपण ती फाईल जेथे ठेवलेली असेल तेथे जावून त्यावर डबल क्लिक ( Double Click ) करुन ती फाईल उघडतो. बर्‍याच वेळा आपणास हवी असलेली आवश्यक फाईल आपण कुठे ठेवली आहे ते आठवत नाही आणि शोधण्यात विनाकारण वेळ वाया जातो. हा वेळ वाचविण्यासाठी त्या फाईलची शॉर्टकट जर डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) ठेवली तर नेहमी ती फाईल उघडण्यासाठी शोधाशोध करण्यापेक्षा त्या  शॉर्टकटवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास ती फाईल लगेच सापडेल व उघडली जाईल.

 शॉर्टकट करण्यासाठी खालिल क्रिया करा.
१ ) आपणास ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीथे जा.
२) ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीला माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करा.
३) आता बाजूला येणार्‍या चौकोनातील ' Send To '  विभागातील ' Desktop (create shortcut) ' वर क्लिक करा.
४) असे केल्याने डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) त्या फाईलची शॉर्टकट बनेल.
तसेच
५ ) त्याच चौकोनातील ' Create Shortcut '  वर क्लिक केल्यास त्या फाईलची शॉर्टकट तिथेच तयार होईल मग ती शॉर्टकटची फाईल तूम्ही जीथे न्याल तेथून ती मूळ फाईल उघडता येईल.

टिप : लक्ष्यात असू द्या की शॉर्टकटची फाईल ही खरंतर मुख्य फाईल उघडण्याची सोय असते, या शॉर्टकट फाईलवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास मुख्य फाईल उघडते. तुम्ही फाईलमध्ये केलेले सर्व बदल मुख्य फाईल होतात, म्हणून जर एखाद्याला/दुसरीकडे जर ही फाईल द्यायची असेल तर शॉर्टकट फाईल देवू नका, त्यांच्याकडे ती उघडणार नाही.  कारण तुम्ही केलेली शॉर्टकट फाईल ही फक्त शॉर्टकट बनविलेल्याच कॉम्प्युटरवरच चालेल.