बर्याच वेळेस आपणास काही ठिकाणी नको असताना देखिल आपला महत्त्वाचा चपत्ता द्यावा लागतो. वास्तविक बर्याच लोकांचा इतर कामांसाठी सर्वसाधारण म्हणजेच वेगळा ई-मेल पत्ता नसतो. कारण शक्यतो तशी गरज पडत नाही, त्यामूळे तसा वेगळा ई-मेल बनविण्याची गरजच पडत नाही. असे असले तरी आपण अशाच विनाकारण लागणार्या गोष्टींसाठी जरी वेगळा ई-मेल बनविला जरी बनविला असला तरी काही ठिकाणी तो आपणास नको असताना देखिल द्यावा लागतो. कारण तो दिल्याने पुढे भविष्यामध्ये त्या ई-मेलवर नको असलेले ई-मेल येण्याची शक्यता असते. अशाच कारणांसाठी टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल फार उपयोगी पडतो. एक असा ई-मेल पत्ता जो काही काळासाठी बनविता येईल आणि ठराविक काळानंतर तो आपोआप बंद होईल. सध्या बर्याच निरनिराळ्या वेबसाईट असाच तात्पुरता म्हणजेच काही काळासाठी जसे १० मिनिट ते एक वर्ष चालेल असा ई-मेल बनविण्याची सोय देतात. म्हणजेच आपण आपल्याल्या हव्या तेवढ्या काळासाठी तो तात्पुरता ई-मेल बनवा आणि आपण निवडलेला कालावधी संपला की तो ई-मेल पत्ता नष्ट होतो. खाली अशाच काही टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल पुरविणार्या वेबसाइटची यादी दिली आहे. http://spambox.us/ http://10minutemail.com/10MinuteMail/ http://www.temporaryinbox.com/ http://www.mailexpire.com/ http://www.tempemail.net/ तसेच गुगल.कॉमवर " Temporary email accounts " असे शोधल्यास आपणास अजूनही चांगल्या वेबसाइट सापडतील. |
---|
संगणक मराठी जग
आमची ओळख
अधिक माहिती
-
▼
2011
(21)
-
▼
June
(21)
- कॉम्प्युटरमध्ये स्क्रिनसेवर कसा बदलावा?
- कॉम्प्युटर मधिल वॉलपेपर कसा बदलावा ?
- विंडोजची ओळख
- मायक्रोसॉफ्ट वर्डची ओळख
- मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ओळख
- फोटोशॉप ७ ओळख
- मॅक्रोमेडिया फ्लॅश
- सीडी राईट कशी करावी?
- शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?
- अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर
- चॅटींग म्हणजे काय व चॅटींग कशी करावी ?
- मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या ग...
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स १
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स २
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ३
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ४
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ५
- काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट
- कॉम्प्युटरमधिल नको असलेले प्रोग्रॅम्स/सॉफ्टवेअर्स ...
- कि-बोर्डचा / माऊसचा वेग कमी/जास्त करा.
- टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल बनवा!
-
▼
June
(21)
Friday, 10 June 2011
टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल बनवा!
कि-बोर्डचा / माऊसचा वेग कमी/जास्त करा.
सध्याच्या तरुण मुलांना कॉम्प्युटरवर अधिकाधिक जलद काम करायला आवडते. यासाठी त्यांचे हात माऊसवर आणि कि-बोर्डवर वेगाने हलत असतात. तर वयोमानानुसार थोडेसे वय झाल्यावर एखाद्या व्यक्तिचा कुठलेही काम करण्याचा वेग थोडासा मंद होतो. अशावेळेस कॉम्प्युटरवर वेगाने फिरणारा माऊस बर्याच लोकांना सहज सापडत नाही आणि तो हलविता ते सावकाश हलवितात, जेणे करुन तो कोठे आहे हे लक्षात येईल. म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या वयानुसार माऊस अथवा कि-बोर्ड वेगात अथवा हळूवार काम करावा अशी गरज भसते. माऊस कितीही वेगाने फिरविला तरी तो त्याच्याच वेगाने फिरतो. मुळात कॉम्प्युटरमध्ये माऊस आणि कि-बोर्ड चालण्याचा वेग ठरविलेला असतो. जो बदलणे सहज शक्य असते. आपण कधीही आपणास हवा असल्याप्रमाणे माऊस अथवा कि-बोर्डचा वेग बदलू शकतो.
|
---|
कॉम्प्युटरमधिल नको असलेले प्रोग्रॅम्स/सॉफ्टवेअर्स काढून टाका.
आपल्या कॉम्प्युटरमध्ये असे अनेक प्रोग्रॅम्स असे असतात जे कधीतरी आपणच कॉम्प्युटरमध्ये टाकलेले असतात पण नंतर ते वापर नसल्याने उगाचच कॉम्प्युटरमध्ये पडून राहिलेले असतात. अशा प्रोग्रॅम्समूळे कॉम्प्युटरची बरीचशी जागा विनाकारण व्यापलेली असते. तसेच अशा प्रोग्रॅम्समूळे आपला कॉम्प्युटर देखिल थोड्याप्रमाणामध्ये स्लो झालेला जाणवितो. मग असे वापरात नसलेले आणि नको असलेले कॉम्प्युटर कॉम्प्युटरमधून काढून टाकणेच योग्य. परंतु कुठलाही प्रोग्रॅम काढण्यापुर्वी एक गोष्ट नक्की करुन घ्यावी की आपण जो प्रोग्रॅम काढणार आहात तो खरच आपल्याला नको आहे ना? असेच आपण जो प्रोग्रॅम काढणार असाल त्याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. कारण आपण माहिती नसलेल्या एखादा प्रोग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला नंतर त्याची गरज पडू शकते अथवा तुम्ही काढलेला एखादा प्रोग्रॅम तो कॉम्प्युटर वापरत असलेली एखादी दुसरी व्यक्ती तो प्रोग्रॅम वापरत असू शकते. त्यामूळे आपल्या कॉम्प्युटरमधून कुठलाही प्रोग्रॅम काढण्यापूर्वी तो कॉम्प्युटर वापरत असलेल्या इतर सर्व व्यक्तींना आपण त्याची सुचना नक्की द्या.
|
---|
काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट
१. www.statusdetect.com - या वेबसाइटवर आपण याहू मॅसेंजरवरील आपल्या 'इनव्हिजिबल' म्हणजेच 'अदृश्य' असलेल्या मित्रमैत्रीणींना पकडू शकता. २. www.yahoo.com - या याहूच्या वेबसाइटवर गेल्यावर याहूचे जे मुख्य पान उघडते त्यातील याहू या नावापूढे असलेल्या ' ! ' वर क्लिक केल्यास 'याहूहूहूहूहूहू.....' असा आवाज ऐकू येईल. लक्षात असू द्य की बर्याच वेळेस याहूची ही वेबसाइट सुरु केल्यास याहू इंडीया ही वेबसाइट उघडते, ज्यावर yahoo.com अशी लिंक दिलेली असते ज्यावर क्लिक करुन ती वरील वेबसाइट सुरु करा. ३. www.easycalculation.com - या वेबसाइटवर आपण वयाचे गणित पाहू शकता. ४. www.transferbigfiles.com - या वेबसाइटद्वारे आपण इतरांना मोठ्या साईझच्या फाईल्स पाठवू शकता. ५. www.downforeveryoneorjustme.com - या वेबसाइटवर आपण एखादी वेबसाइट चालू आहे का नाही ते पाहू शकता. ६. www.dontclick.it - इटलीच्या या वेबसाइटवर कुठेही क्लिक करायची गरज पडत नाही. म्हणजेच 'न' क्लिक करता ही वेबसाइट पाहाता येईल अशीच ती बनविली आहे. ७. www.pimpmysearch.com - या वेबसाइटवर आपण आपले नाव दिल्यास गुगल पुढील वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यास गुगल सदृश वेबसाइट सुरु होईल पण त्यावर गुगल एवजी आपले नाव असेल. ८. www.cooltoad.com - जवळजवळ सर्व भाषांतील गाणी डाऊनलोड करण्यासाठी हि एक चांगली वेबसाईट आहे. मुळात हि एक अशी वेबसाईट आहे जेथे कुणीही त्याला हवी असलेली गाण्याची फाईल [ mp3 ] इतकेच नव्हे तर कोणतीही आवाजाची फाईल ह्या वेबसाईटवर टाकू शकतो. ९. www.meebo.com - याहू, हॉटमेल, जीमेल इ. मॅसेंजरद्वारे चॅटिंग करण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटर टाकणे (इंस्टॉल करणे)आवश्यक असते. याला पर्याय म्हणून www.meebo.com या वेबसाईटवर या सर्व प्रकारातील चॅटिंग कोणतेही सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये न टाकता करता येते. १०. www.howstuffworks.com - सर्व प्रकारच्या गोष्टी कशा काम करतात म्हणजेच त्यामागचे शास्त्रिय कारण व ते मानवाने त्यात वापरलेले कौशल्य याद्वारे ती वस्तु कशी बनली व ती कशी काम करते ही सर्व माहिती या वेबसाईट दिली आहे. ११. www.ehow.com - एखादी गोष्ट कशी हाताळायची अथवा कशी करायची अशा अनेक प्रनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट दिली आहे. १२. www.bugmenot.com - बर्याच वेळेस एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर आपणास ती वेबसाइट पाहण्यासाठी त्या वेबसाइटचे मोफत सभासद व्हावे लागते आणि त्यानंतरच त्या वेबसाइट वरील आपल्या मोफत लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगीन करता येते. हा सभासद होण्याचा वेळ वाचविण्यासाठी ही वेबसाइट उपयोगी पडते. १३. www.computerpranks.com - कॉम्प्युटरवर खोड्या करुन इतरांना फसविण्याचा आणि नंतर हसविण्याचा विचार करीत असाल तर या वेबसाईटवर तुम्हाला बरेच प्रोग्रॅम्स मिळतील, पण लक्षात असूद्या कुठलाही प्रोग्रॅम वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती वाचा आणि मगच वापरा. |
---|
कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ५

इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स | |||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ४
विंडोज एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
Subscribe to:
Posts (Atom)