आमची ओळख

My photo
बी.डी.डी वरळी, महाराष्ट्र, India

अधिक माहिती

Friday, 10 June 2011

कॉम्प्युटरमधिल नको असलेले प्रोग्रॅम्स/सॉफ्टवेअर्स काढून टाका.


 
आपल्या कॉम्प्युटरमध्ये असे अनेक प्रोग्रॅम्स असे असतात जे कधीतरी आपणच कॉम्प्युटरमध्ये टाकलेले असतात पण नंतर ते वापर नसल्याने उगाचच कॉम्प्युटरमध्ये पडून राहिलेले असतात. अशा प्रोग्रॅम्समूळे कॉम्प्युटरची बरीचशी जागा विनाकारण व्यापलेली असते. तसेच अशा प्रोग्रॅम्समूळे आपला कॉम्प्युटर देखिल थोड्याप्रमाणामध्ये स्लो झालेला जाणवितो. मग असे वापरात नसलेले आणि नको असलेले कॉम्प्युटर कॉम्प्युटरमधून काढून टाकणेच योग्य.
परंतु कुठलाही प्रोग्रॅम काढण्यापुर्वी एक गोष्ट नक्की करुन घ्यावी की आपण जो प्रोग्रॅम काढणार आहात तो खरच आपल्याला नको आहे ना? असेच आपण जो प्रोग्रॅम काढणार असाल त्याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. कारण आपण माहिती नसलेल्या एखादा प्रोग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला नंतर त्याची गरज पडू शकते अथवा तुम्ही काढलेला एखादा प्रोग्रॅम तो कॉम्प्युटर वापरत असलेली एखादी दुसरी व्यक्ती तो प्रोग्रॅम वापरत असू शकते. त्यामूळे आपल्या कॉम्प्युटरमधून कुठलाही प्रोग्रॅम काढण्यापूर्वी तो कॉम्प्युटर वापरत असलेल्या इतर सर्व व्यक्तींना आपण त्याची सुचना नक्की द्या.
कॉम्प्युटरमधून एखादा प्रोग्रॅम कसा काढायचा?
 
साधारणपणे कॉम्प्युटरमधिल स्टार्ट मधिल प्रोग्रॅम्स विभागातील आपणास नको असलेल्या प्रोग्रॅम/सॉफ्टवेअरच्या जागेमध्येच "Uninstall"  ची म्हणजेच तो प्रोग्रॅम काढण्याची सोय असते. एखादा प्रोग्रॅम "Uninstall"  करणे म्हणजे तो प्रोग्रॅम काढून टाकणे होय.  एखाद्या प्रोग्रॅमच्या जागेतील "Uninstall"  बटणावर क्लिक करुन आपण तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट करु शकता. पण काही वेळेस काही प्रोग्रॅमच्या जागेमध्ये "Uninstall"  हे बटण नसते मग अशावेळेस विंडोजमध्ये कुठलाही प्रोग्रॅम काढण्याची निराळी सोय असते.
आपणास नको असलेल्या एखाद्या प्रोग्रॅमच्या ठिकाणी तो प्रोग्रॅम काढण्यासाठी "Uninstall"  ची सोय नसेल तर तो प्रोग्रॅम काढण्यासाठी क्रिया खाली दिली आहे.

१. Start > Settings >  मधिल  Control Panel  विभाग सुरु करा.

२. आता त्यातील 'Add or Remove Programs'  म्हणजेच आयकॉनवर डबलक्लिक करा.

३. आता आपल्यासमोर 'Add or Remove Programs' चा चौकोन उघडेल, आपणास नको असलेल्या म्हणजेच काढावयाच्या प्रोग्रॅमवर क्लिक करुन त्याच्या बाजूच्या 'Remove'  या बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे तो प्रोग्रॅम काढताना येणार्‍या विंडो मध्ये पुढे Next, Next, Finish  अशा बटणांवर क्लिक करुन शेवटी तो प्रोग्रॅम कॉम्प्युटरमधून कायमचा नष्ट होतो.

No comments:

Post a Comment