आमची ओळख

My photo
बी.डी.डी वरळी, महाराष्ट्र, India

अधिक माहिती

Thursday, 9 June 2011

मॅक्रोमेडिया फ्लॅश

 

फ्लॅश सॉफवेअर हे ऍनिमेशन करण्यासाठी वापरले जाते. कुठलेही ऍनिमेशनचे सॉफवेअर शिकण्यासाठी त्या सॉफवेअरची आवश्यक माहिती शिकणे तसेच आपली कल्पनाशक्ती वापरणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. फ्लॅश सॉफवेअर हे तितकेसे किचकट नसले तरी इतर सॉफवेअर्स प्रमाणे सोपे देखिल नाही, म्हणूनच फ्लॅश शिकण्यासाठी इथे दिलेल्या सर्व गोष्टी क्रमाने वाचून-समजून-करुन पाहिल्यास ते पटकन कळेल.
फ्लॅश शिकण्यासाठीच्या सर्व गोष्टी खाली क्रमाक्रमाने खाली दिल्या आहेत, त्या त्याच क्रमाने शिकत पूढे गेल्यास आपणास लवकरच फ्लॅश सॉफवेअर समजेल. शेवटी आपली मेहनत आणि शिकण्यातला रस या दोन्ही गोष्टी इथे जास्त आवश्यक आहेत.
टीप : इथे फ्लॅश ८ सॉफवेअरमध्ये ऍनिमेशन दाखविले असले तरी सध्या वापरल्या जाणार्‍या फ्लॅशच्या नविन आवृत्ती मध्ये देखिल याच प्रकारे ऍनिमेशन करता येते. इतकेच नाही तर आपल्याकडे फ्लॅश सॉफवेअरची कोणतीही आवृत्ती असल्यास इथे दाखविल्या प्रमाणे आपणास ऍनिमेशन त्यातही करता येईल.
प्रस्तावना
सध्या प्रेसेंटेशन, वेबसाईटवरील जाहिराती, शुभेच्छापत्र, कंपनीची माहिती, कॉम्प्युटर गेम्स अश बर्‍याच ठिकाणी ऍनिमेशनसाठी फ्लॅश ह्या सॉफवेअरचा वापर केला जातो.
ऍनिमेशनमध्ये 2D आणि 3D  असे दोन प्रमुख भाग आहेत. फ्लॅश सॉफवेअरमध्ये 2D  ऍनिमेशन केले जाते. उदा. तुम्हाला माहित असलेली www.rediff.com  वेबसाईट उघडा समोरच तुम्हाला एखाद्या जाहिरातीचे चांगले ऍनिमेशन पहायला मिळेल.
फ्लॅशमध्येच नाही तर कोणतेही ऍनिमेशनचे सॉफवेअर शिकताना काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे फार आवश्यक असते. त्यापैकी काही अति महत्त्वाच्या गोष्टी खाली दिल्या आहेत.
१) ऍनिमेशनच्या सॉफवेअरमध्ये सर्व गोष्टी आपोआप होतात असे नाही बरेचसे काम आपल्यालाच करावे लागते आणि त्यामध्ये ऍनिमेशन (हालचाल) भरण्याचे काम ते सॉफवेअर करते. उदा. खाली दाखविल्याप्रमाणे एखादा चेंडू वर-खाली होताना दाखवायचा असेल तर प्रथम त्यासंबंधीची पाच चित्रे आपणास करावी लागतील.
वर दाखविल्याप्रमाणे पहिली पाच चित्रे बनविल्यानंतरच त्यामध्ये ऍनिमेशन (हालचाल) भरण्याचे काम सॉफवेअर द्वारे करता येते.
२) ऍनिमेशनमध्ये वेळ आणि वेग एकत्र काम करतात म्हणजेच एखाद्या गोष्टीचा वेग मंद करायचा असल्यास त्याचा ऍनिमेशनचा वेळ वाढवायचा किंवा त्याच वेग जलद केल्यास त्याच्या ऍनिमेशनला लागणारा वेळ कमी होतो.
टीप : वरील दोन्ही गोष्टी जर कळल्या नाहित तरी चालतील कारण शेवटी काम करताना सर्व गोष्टी शिकायला मिळतातच.
सुरुवात
शिकण्याच्या दृष्टीने कुठलेही सॉफवेअर दोन प्रकारात मोडते. १) एखादे सॉफवेअर सोपे असते ते शिकताना पटकन कळते. २) एखादे सॉफवेअर मोठे असल्याने ते पटकन कळत नाही, ते शिकायला वेळ लागतो आणि अशावेळी ते किचकट वाटू लागते.
एखादे सॉफवेअर सोपे असल्यास ते व्यवस्थित, पूर्ण शिकून घ्यावे जेणे करुन त्यातील सर्व गोष्टींचा वापर आपल्याला कामासाठी करता येईल. पण जर एखादे सॉफवेअर मोठे आणि किचकट वाटत असल्यास सुरवातीला त्यातील सोप्या वाटणार्‍य आणि छोट्या-छोट्या गोष्टी शिकून घ्याव्या. जेणेकरुन ते सॉफवेअर थोडेतरी हाताळता येईल आणि नंतर मग हळू हळू त्या सॉफवेअरची सवय झाल्यास त्यातील इतर किचकट गोष्टी शिकता येतील.
फ्लॅश हे ऍनिमेशनचे सॉफवेअर जास्त किचकट जरी नसले तरी इतर सॉफवेअर्सच्या तुलनेत थोडे वेगळे आहे. फ्लॅश ऍनिमेशन करण्यासाठी जरी असले तरी ते उघडल्यावर ऍनिमेशनशी संबंधित कुठलीच बटणे त्यामध्ये दिसत नाहित. दिसायला ते विंडोजमधिल पेंट या सॉफवेअर प्रमाणे दिसते. त्यामुळे ते कसे शिकायचे असा प्रश्न पडतो.
फ्लॅश सॉफवेअर पटकन शिकण्यासाठी ते लक्ष्यात राहिल अशा छोट्या-छोट्या ऍनिमेशनच्या उदाहरणांनी शिकल्यास ते पटकन कळते.
उदाहरण १

१. बाजूच्या टूलबारमधिल टूलवर क्लिक करा आणि पेपरवर म्हणजेच 'Work Area'  वर गोल ड्रॉ करा.
टीप : कुठलाही नविन Layer  वर कुठलेही ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यावर पानावरील Timeline  बारवर आपोआप एक काळा ठिपका तयार होतो त्यास 'Keyframe'  असे म्हणतात. (खाली चित्रामध्ये दाखविले आहे.)

२. आता पानावरील 'Layer 1'  वर क्लिक करुन त्या गोल ऑब्जेक्टला सिलेक्ट करा.

३. आता कि-बोर्डवरील ' F8 '  वरील बटण दाबा. त्याने आपल्यासमोर 'Convert to Symbol'  चा चौकोन सुरु होईल.
४. या 'Convert to Symbol'  चा चौकोनातील 'Graphic'  समोरील   क्लिक करुन 'OK'  बटणावर क्लिक करा.

५. असे केल्याने तो ड्रॉ केलेला गोल ऑब्जेक्ट 'Graphic'  या प्रकारात बदलेल.
टीप : फ्लॅशमध्ये कुठल्याही ऑब्जेक्टला हालचाल अथवा एखादा ईफेक्ट देण्यापूर्वी त्याला 'Graphic'  या प्रकारात बदलणे आवश्यक आहे.

६.  आता बाजूच्या टूलबारमधिल  टूलने पानावरील Timeline  बारवरील '50 frame'  वर क्लिक करुन कि-बोर्डवरील 'F6'  बटण दाबा. असे केल्याने त्या '50 frame'  वर तसाच काळा ठिपका येईल, म्हणजेच तेथे 'Keyframe'  तयार होईल.

७. आता बाजूच्या टूलबारमधिल त्याच  टूलने त्या गोल ऑब्जेक्टला सिलेक्ट करुन त्या माऊसने हलकेच दाबूने थोडे बाजूला हलवा म्हणजेच त्याची जागा बदला.

८. आता वरील Timeline  बारमध्ये '1 frame'  ते '50 frame'  मधिल फ्रेम्स सिलेक्ट झालेल्या दिसतील. त्या जागेमध्ये कुठल्याही फ्रेमवर माऊसने 'राईट क्लिक (Right Click)'  करुन त्याबाजूला येणार्‍या छोट्या चौकोनातील 'Create Motion Tween'  वर क्लिक करा.
टीप :  'Create Motion Tween'  मूळे एखाद्या ऑब्जेक्टच्या दोन वेगवेगळ्या फ्रेम्समधिल बदललेल्या जागेमध्ये ऍनिमेशन म्हणजेच हालचाल भरली जाते.

९. बस्स इतकेच. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास तो गोल ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसेल.

१०. आता हेच ऍनिमेशन पूर्ण अवस्थेमध्ये पहायचे असल्यास कि-बोर्डवरील कंट्रोलचे बटण दाबून एंटरचे बटण (Ctrl + Enter)  दाबा.

उदाहरण २

१. बाजूच्या टूलबारमधिल टूलवर क्लिक करा आणि पेपरवर म्हणजेच 'Work Area'  वर चौकोन ड्रॉ करा.
टीप : कुठलाही नविन Layer  वर कुठलेही ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यावर पानावरील Timeline  बारवर आपोआप एक काळा ठिपका तयार होतो त्यास 'Keyframe'  असे म्हणतात. (खाली चित्रामध्ये दाखविले आहे.)

२. आता पानावरील 'Layer 1'  वर क्लिक करुन त्या गोल ऑब्जेक्टला सिलेक्ट करा.

३. आता कि-बोर्डवरील ' F8 '  वरील बटण दाबा. त्याने आपल्यासमोर 'Convert to Symbol'  चा चौकोन सुरु होईल.
४. या 'Convert to Symbol'  चा चौकोनातील 'Graphic'  समोरील   क्लिक करुन 'OK'  बटणावर क्लिक करा.

५. असे केल्याने तो ड्रॉ केलेला गोल ऑब्जेक्ट 'Graphic'  या प्रकारात बदलेल.
टीप : फ्लॅशमध्ये कुठल्याही ऑब्जेक्टला हालचाल अथवा एखादा ईफेक्ट देण्यापूर्वी त्याला 'Graphic'  या प्रकारात बदलणे आवश्यक आहे.

६.  आता बाजूच्या टूलबारमधिल  टूलने पानावरील Timeline  बारवरील '50 frame'  वर क्लिक करुन कि-बोर्डवरील 'F6'  बटण दाबा. असे केल्याने त्या '50 frame'  वर तसाच काळा ठिपका येईल, म्हणजेच तेथे 'Keyframe'  तयार होईल.

७. आता बाजूच्या टूलबारमधिल त्याच  टूलने त्या चौकोन ऑब्जेक्टला सिलेक्ट करुन त्या माऊसने हलकेच दाबूने थोडे बाजूला हलवा म्हणजेच त्याची जागा बदला.

८. आता वरील Timeline  बारमध्ये '1 frame'  ते '50 frame'  मधिल फ्रेम्स सिलेक्ट झालेल्या दिसतील. त्या जागेमध्ये कुठल्याही फ्रेमवर माऊसने 'राईट क्लिक (Right Click)'  करुन त्याबाजूला येणार्‍या छोट्या चौकोनातील 'Create Motion Tween'  वर क्लिक करा.
टीप :  'Create Motion Tween'  मूळे एखाद्या ऑब्जेक्टच्या दोन वेगवेगळ्या फ्रेम्समधिल बदललेल्या जागेमध्ये ऍनिमेशन म्हणजेच हालचाल भरली जाते.

९. आता वरील Timeline  बारमध्ये '50 frame'  वर क्लिक करा.

१०. आता बाजूच्या टूलबार मधिल   वर क्लिक करा. १०. आता बाजूच्या टूलबार मधिल   वर क्लिक करा. असे केल्याने पानावरील त्या चौकोनाच्या बाजूला आठ ठिपके येतील.

११. आता त्या चौकोनाच्या कुठल्याही कोपर्‍याच्या ठिपक्याच्या बाजूला माऊस नेताच एक गोलाकार बाण तयार होतो. त्यातीथे माऊसचे बटण दाबून थोडेसे गोला फिरविल्यास, तो चौकोन गोल फिरेल.

१२. बस्स इतकेच. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास तो चौकोन ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसेल. तसेच पूढे सरकताना तो गोल फिरेल.

१३. आता हेच ऍनिमेशन पूर्ण अवस्थेमध्ये पहायचे असल्यास कि-बोर्डवरील कंट्रोलचे बटण दाबून एंटरचे बटण (Ctrl + Enter)  दाबा.

उदाहरण ३

१. बाजूच्या टूलबारमधिल टूलवर क्लिक करा आणि पेपरवर म्हणजेच 'Work Area'  वर चौकोन ड्रॉ करा.
टीप : कुठलाही नविन Layer  वर कुठलेही ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यावर पानावरील Timeline  बारवर आपोआप एक काळा ठिपका तयार होतो त्यास 'Keyframe'  असे म्हणतात. (खाली चित्रामध्ये दाखविले आहे.)

२. आता पानावरील 'Layer 1'  वर क्लिक करुन त्या गोल ऑब्जेक्टला सिलेक्ट करा.

३. आता कि-बोर्डवरील ' F8 '  वरील बटण दाबा. त्याने आपल्यासमोर 'Convert to Symbol'  चा चौकोन सुरु होईल.
४. या 'Convert to Symbol'  चा चौकोनातील 'Graphic'  समोरील   क्लिक करुन 'OK'  बटणावर क्लिक करा.

५. असे केल्याने तो ड्रॉ केलेला गोल ऑब्जेक्ट 'Graphic'  या प्रकारात बदलेल.
टीप : फ्लॅशमध्ये कुठल्याही ऑब्जेक्टला हालचाल अथवा एखादा ईफेक्ट देण्यापूर्वी त्याला 'Graphic'  या प्रकारात बदलणे आवश्यक आहे.

६.  आता बाजूच्या टूलबारमधिल  टूलने पानावरील Timeline  बारवरील '50 frame'  वर क्लिक करुन कि-बोर्डवरील 'F6'  बटण दाबा. असे केल्याने त्या '50 frame'  वर तसाच काळा ठिपका येईल, म्हणजेच तेथे 'Keyframe'  तयार होईल.

७. आता बाजूच्या टूलबारमधिल त्याच  टूलने त्या चौकोन ऑब्जेक्टला सिलेक्ट करुन त्या माऊसने हलकेच दाबूने थोडे बाजूला हलवा म्हणजेच त्याची जागा बदला.

८. आता वरील Timeline  बारमध्ये '1 frame'  ते '50 frame'  मधिल फ्रेम्स सिलेक्ट झालेल्या दिसतील. त्या जागेमध्ये कुठल्याही फ्रेमवर माऊसने 'राईट क्लिक (Right Click)'  करुन त्याबाजूला येणार्‍या छोट्या चौकोनातील 'Create Motion Tween'  वर क्लिक करा.
टीप :  'Create Motion Tween'  मूळे एखाद्या ऑब्जेक्टच्या दोन वेगवेगळ्या फ्रेम्समधिल बदललेल्या जागेमध्ये ऍनिमेशन म्हणजेच हालचाल भरली जाते.

९. आता बाजूच्या टूलबारमधिल   टूलने  वरील Timeline बारमध्ये '50 frame' वर क्लिक करा आणि त्याच   टूलने त्या चौकोन ऑब्जेक्टला सिलेक्ट करा.

१०. आता त्याच टूलने पानाच्या खालील  Properties  बारमध्ये  Color  विभागावर क्लिक करा आणि त्यातील Tint  या उपविभागावर क्लिक करुन खाली दाखविल्याप्रमाणे रंग बदला.

११. बस्स इतकेच. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास तो चौकोन ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसेल. तसेच पूढे सरकताना त्याचा रंग बदलताना दिसेल.

१३. आता हेच ऍनिमेशन पूर्ण अवस्थेमध्ये पहायचे असल्यास कि-बोर्डवरील कंट्रोलचे बटण दाबून एंटरचे बटण (Ctrl + Enter)  दाबा.




No comments:

Post a Comment