![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
निरनिराळे सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी सॉफ्टवेअर्स असले तरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही फोटोशॉप सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते. फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स आहेत. फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात. जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच कृष्णधवल फोटोला रंगीत करायचे असेल, एखाद्या फोटोमधिल मागील चित्र बदलायचे असल्यास, एखाद्या जुन्या खराब झालेल्या फोटोला चांगले करायचे असल्यास, दोन निरनिराळ्या चित्रांना एक करायचे असल्यास, सरळ अक्षरांना वेड्यावाकड्या निरनिराळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी. इतकेच नाही तर संपुर्ण फोटो एवजी त्या फोटोमधिल एखाद्याच ठिकाणी बदल करायचा असला तरी फोटोशॉपमध्ये ते शक्य होते, जसे एखाद्या फोटोमधिल एखादी व्यक्ती काढून तीला दुसर्याच फोटोमध्ये निराळ्याच लोकांबरोबर दाखवायचे असेल, एखाद्या फोटोमधिल एखाद्या व्यक्तीचा कपड्यांचा रंग बदलायचा असेल. अशा बर्याच गमतीदार बदल करण्याची सोय फोटोशॉपमध्ये असल्याने फोटोशॉप बर्याच लोकांचे आवडते सॉफ्टवेअर बनले आहे. टीप: सध्या फोटोशॉप CS 3 जरी वापरले जात असले तरी आजही बर्याच ठिकाणी फोटोशॉप ७ वापरले जाते, म्हणून येथे फोटोशॉप ७ मध्ये वापरता येतील असे इफेक्टस दिले आहेत. असे असले तरी हे सर्व इफेक्टस फोटोशॉपच्या नविन प्रकारामध्ये देखिल वापरता येतील. | ||||||
फोटोशॉपमधिल टूलबारी माहिती
|
|
---|
आपण या ब्लॉगची सरळ सरळ चोरी केलेली आहे ही पोस्ट http://www.sahajach.com मधील जसाच्या तसा उतारा आहे नवीन काही नाही
ReplyDeleteया पेक्षा चांगली माहिती फोटोशॉप बद्दल आणि इतर विषयांबद्दल तीही मराठीतून तुम्हाला खालील साईट वर मिळेल
ReplyDeletewww.dnyanamrut.com