मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सर्रास वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. असे असले तरी या सॉफ्टवेअर मधिल बऱ्याच गोष्टी सर्वांना माहित नसतात ज्या काम करताना उपयोगी पडू शकतात. इतकेच नाही तर आपले काम अधिक सोपे आणि लवकर होऊ शकते. १) काही वेळेस अशी गरज पडते की आपण इंग्रजी मध्ये टाईप केलेले वर्ड मधिल काही भाग अथवा संपूर्ण फाईल मधिल काम आपणास बदलून इंग्रजीत कॅपिटल अथवा स्मॉल [ Capital or Small characters ] अक्षरांमध्ये करुन हवे असते. अशा वेळेस आपणास जो परिच्छेद हवा असेल तो सिलेक्ट करुन बटनांच्या वरील मेनू बार मधिल फॉरमॅट [ Format ] विभागातील चेंज केस [ Change Case ] वर क्लिक करा. आता इथे समोर येणाऱ्या चौकोनामध्ये आपणास आपले काम कोणत्या प्रकारामध्ये हवे आहे ते निवडून खालील 'OK' वर क्लिक केल्यास त्याप्रमाणे आपणास आपले काम कॅपिटल अथवा स्मॉल अक्षरामध्ये बदलता येते. ![]() ![]() २) हेडर आणि फुटर Header and Footer :- बऱ्याच वेळेस अशी गरज पडते की वर्ड मध्ये एखाद्या फाईलमध्ये काम करताना त्यातील प्रत्येक पानाच्या वर आणि खाली काहीतरी गोष्ट सतत हवी असते. जसे एखादी फाईल जर कंपनी पत्राप्रमाणे [ Letterhead ] हवी असल्यास त्या फाईलच्या प्रत्येक पानाच्या वर आपणास त्या कंपनीचे नाव द्यावे लागते, तसेच प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस पान क्रमांक अथवा दिनांक हवा असतो. ![]() ![]() ![]() ३) फुल स्क्रिन [ Full Screen ] : तसे पाहता वर्ड मध्ये काम करताना जिथे आपण टाईप करतो ती काम करायची जागा पुरेशी आहे. वरच्या बाजूस असलेली बटनांनी व्यापलेली जागा त्या मानाने फारच कमी आहे, तरी देखिल एखाद्या वेळेस काम करताना आपणास जर आपल्या कामाव्यतिरीक्त इतर कुठल्याही गोष्टी दिसू नये असे वाटत असल्यास बटनांच्या वर असलेल्या मेनूबार मधिल [ View ] विभागातील [ Full Screen ] वर क्लिक केल्यास इतर सर्व गोष्टी बंद होऊन आपली चालू फाईल समोर दिसते. त्या सोबत स्क्रिनवर [ Full Screen ] बंद करण्यासाठी ![]() ![]() ![]() ४) एखादे वाक्य अथवा गोष्ट कॉपी [ Copy ] केली ती कॉम्प्युटरच्या डोक्यामध्ये तात्पुरती साठवली जाते आणि पेस्ट [ Paste ] केल्यानंतर कॉपी केलेली गोष्ट तशीच्या तशी तिथे उमटते. त्यानंतर दुसरी एखादी गोष्ट कॉपी केल्यास आधी कॉपी केलेली गोष्ट कॉम्प्युटरच्या डोक्यातून निघून जाते व नंतर पुन्हा पेस्ट केल्यास फक्त शेवटी कॉपी केलेलीच गोष्ट उमटते, हे सर्वांना माहित असते. परंतु मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये यासाठी एक चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण जसजसे एक - एक गोष्ट कॉपी करत जाता तसतसे कॉम्प्युटर त्याच्या डोक्यातून आधी कॉपी केलेल्या गोष्टी काढून टाकतो व शेवटी कॉपी केलेली गोष्ट डोक्यात ठेवतो त्या ऐवजी वर्ड मधिल या महत्वाच्या व्यवस्थेमूळे वर्ड सॉफ्टवेअर आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी डोक्यात साठवत जातो. [ Edit ] विभागातील [ Office Clipboard ] या नावावर क्लिक केल्यास पानाच्या उजव्या बाजूस एक रकाना सुरु करतो. त्यामध्ये आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी असतात. आपणास जेव्हा जो शब्द हवा असेल तेव्हा त्या ( आधी कॉपी केलेल्या ) शब्दावर क्लिक केल्यास तो शब्द अथवा वाक्य पानावर उमटते. ![]() ५) वर्डमध्ये आपल्या फाईलमध्ये एखादे चित्र [ Photo / Image ] आणायचे असेल तर बटनांच्या वरील मेनूबार मधिल [ Insert ] ह्या विभागातील [ Picture ] या उपविभागामध्ये [ From File ] वर क्लिक करा. यामुळे आपणा समोर येणाऱ्या चौकोनात कॉम्प्युटर आपले चित्र निवडायला सांगेल. तुम्ही हव्या असलेल्या फोल्डरमध्ये जाऊन ते चित्र सिलेक्ट करायचे व नंतर त्या चौकोनातील [ Insert ] ह्या बटनावर क्लिक केल्यास ते चित्र आपल्या चालू फाईलमध्ये येते. ![]() ![]() ६) आपल्या चालू फाईलच्या मागच्या बाजूस एखादा रंग अथवा एखादी छानशी डिझाईन द्यायची असल्यास बटनांच्या वरील मेनूबार मधिल Format विभागातील Background वर क्लिक केल्यास बाजूला रंगांचा एक चौकोन येतो, त्यातील आपणास हवा असलेला रंग निवडल्यास तो रंग चालू फाईलीच्या येतो. त्याच विभागात More Colors आणि Fill Effects द्वारे इतर अनेक रंग तसेच रंगाच्या विविध छटा देवू शकतो. ![]() |
---|
आमची ओळख
अधिक माहिती
-
▼
2011
(21)
-
▼
June
(21)
- कॉम्प्युटरमध्ये स्क्रिनसेवर कसा बदलावा?
- कॉम्प्युटर मधिल वॉलपेपर कसा बदलावा ?
- विंडोजची ओळख
- मायक्रोसॉफ्ट वर्डची ओळख
- मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ओळख
- फोटोशॉप ७ ओळख
- मॅक्रोमेडिया फ्लॅश
- सीडी राईट कशी करावी?
- शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?
- अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर
- चॅटींग म्हणजे काय व चॅटींग कशी करावी ?
- मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या ग...
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स १
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स २
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ३
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ४
- कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स ५
- काही निराळ्या तर काही उपयोगी वेबसाइट
- कॉम्प्युटरमधिल नको असलेले प्रोग्रॅम्स/सॉफ्टवेअर्स ...
- कि-बोर्डचा / माऊसचा वेग कमी/जास्त करा.
- टेंपररी म्हणजेच तात्पुरता ई-मेल बनवा!
-
▼
June
(21)
Friday, 10 June 2011
मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या गोष्टी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment