आमची ओळख

My photo
बी.डी.डी वरळी, महाराष्ट्र, India

अधिक माहिती

Thursday, 9 June 2011

विंडोजची ओळख

 

 
खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण दिले आहे.
१. Start Menu -  स्टार्ट मेनू :- विंडोज हाताळण्यसाठी तसेच निरनिरळे प्रोग्राम सुरु करण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो, म्हणूनच या बटणावर ' Start '  म्हणजेच 'सुरुवात' असे लिहिले आहे.
२. Quick Launch - क्विक लॉन्च :- या मध्ये काही महत्वाचे प्रोग्राम लोड करतान आपोआप जमा होतात वर दिलेल्या स्टार्ट मेनू मधिल प्रोग्राम विभागातून एखादा प्रोग्राम सुरु करण्याएवजी या क्विक लॉन्च म्हणजेच 'पटकन सुरु' या विभागातून देखिल तो प्रोग्राम सुरु करता येतो.
तुम्हाला हव्या असलेल्या एखाद्या प्रोग्रामच्या आयकॉनला पकडून जरी या क्विक लॉन्च विभागात आणले तरी पटकन त्याची या विभागात शॉर्टकट तयार होते व पुढच्यावेळी या विभागातील त्या आयकॉनवर क्लिक करुन तो प्रोग्राम सुरु करता येतो.
३. Active Programs - चालू प्रोग्राम्स :- या मध्ये आपण जे जे प्रोग्राम्स चालू केले असतील त्याची नावे दिसतात. म्हणजेच एखादा प्रोग्राम सुरु करण्याआधी तो प्रोग्राम आपण आधीच सुरु केलेला असेल तर येथे त्याचे नाव दिसते.
४. Task Bar - प्रोग्राम्स बार :- या जागेमध्ये जे जे प्रोग्राम्स आपण सुरु कराल त्याचे नाव दिसते.
५. Notification Area - नोटीफीकेश एरीया :- या जागेला ' System Tray ' असेही म्हणतात. या विभागामध्ये आपण काहीच बदल करु शकत नाही. विंडोज सुरु होतानाच काही सॉफ्टवेअर्स सुरुवातीलच आपोआप सुरु होतात (उद. मॅसेंजर, अँटी-व्हायरस ई. सॉफ्टवेअर्स) हे सॉफ्टवेअर्स महत्त्वाचे असल्याने विंडोज सुरु होतानाच ते देखिल आपोआप सुरु होतात. याच विभागामध्ये चालू दिनांक आणि वेळ दाखविली जाते ती जर बदलायची असल्यास अथवा चुकीची असल्यास बदलण्यासाठी त्यावर ' डबल क्लिक ( Double Click ) ' करावे त्यामूळे येणार्‍या चौकोनामध्ये दिनांक आणि वेळ बदलण्याची सोय असते.
६. Desktop Icons - डेस्कटॉपवरील आयकॉन  :- या चित्रांना ' आयकॉन '  असे म्हणतात. त्यामध्ये 'My Documents',  'My Computer', 'My Network Places', 'Recycle Bin', हे प्रमुख चार आयकॉन सर्वच कॉम्प्युटरवर आढळतात. तर इतर आयकॉन हे सॉफ्टवेअर लोड करताना तर काही आपण तयार केलेल्या फाईलींचे आयकॉन असतात.
७. Desktop - डेस्कटॉप :- या जागेस डेस्कटॉप म्हणजेच विंडोजची जागा असे म्हणतात. या जागेस विंडोजचे सुरवातीचे पान असे देखिल म्हटले जाते.
खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण दिले आहे.

१. ' Turn Off '  कॉम्प्युटर बंद करण्यासाठी :-
या विभागातील 'Stand By'  या बटणावर क्लिक केल्यास  कॉम्प्युटर कमीत कमी वीज वापरुन सुप्तावस्थेमध्ये चालू राहतो, 'Turn Off'  या बटणावर क्लिक केल्यास  कॉम्प्युटर बंद होतो तर 'Restart'  या बटणावर क्लिक केल्यास  कॉम्प्युटर बंद होवून पुन्हा सुरु होतो.

२. ' Log Off '  ठराविक खाते बंद करण्यासाठी :-
विंडोजमध्ये एका कॉम्प्युटरवर अनेक व्यक्ती आपापल्यासाठी स्वतःचे खाजगी खाते बनवू शकतात, त्यांना ' युजर '  असे म्हणतात. विंडोज सुरु करताना जर एखाद्या युजरने त्याच्या खाजगी खात्याद्वारे विंडोज सुरु केला असेल तर ते येथे 'Log Off'  या बटणाद्वारे  बंद करता येते तसेच तेथील 'Switch User'  या बटणाद्वारे एका युजर मधून दुसर्‍या युजरच्या नावाने प्रवेश करता येतो.

३. ' Run '  रन :- विंडोजशी संबंधित एखादी विशिष्ट सुचना देवून एखादे काम करण्यासाठी अथवा एखाद्या सॉफ्टवेअरशी संबंधित विंडोजला एखादी विशिष्ट आज्ञा देण्यासाठी या विभागाचा वापर केला जातो.
४. ' Help and Support ' सहाय्य अथवा मदत  :- या विभागामध्ये आपणास विंडोजशी संबंधित सर्व माहिती तसेच मार्गदर्शन मिळेल.
५. ' Search ' शोधाशोध  :- या विभागामध्ये आपण त्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईल्स अथवा फोल्डर तसेच इंटरनेटवर शोधाशोध  करु शकतो.
६. ' Settings ' तांत्रिकगोष्टी :- या विभागामध्ये विंडोजमधिल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी  संबंधित गोष्टी हाताळल्या जातात. त्यातील ' Control Panel ' हे सर्वात महत्त्वाचे बटण आहे. तर या विभागातील ' Network Connections ' या विभागामध्ये त्या कॉम्प्युटरल्या इतर कॉम्प्युटरशी जोडण्याविषयी असलेल्या तांत्रिकबाबी हाताळल्या जातात आणि ' Printer and Faxes ' या विभागामध्ये त्या कॉम्प्युटरल्या जोडलेल्या अथवा जोडावयाच्या प्रिंटरसंबंधी तांत्रिकबाबी हाताळल्या जातात.
७. ' Documents ' उघडलेल्या फाईलींची नोंद :- या विभागामध्ये शेवटी शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद असते. एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एखादी फाईल उघडून त्यामध्ये थोडावेळ काम केल्यास या विभागामध्ये त्याची शॉर्टकट तयार होते. मग पुढिल वेळेस या विभागामधिल आपल्या त्या फाईलीच्या शॉर्टकटवर क्लिक केल्यास आपली मुख्य फाईल उघडते. या विभगामध्ये काही मर्यादीत फाईलीच्याच शॉर्टकटची नोंद राहते व जास्त फाईली उघडल्यागेल्यास जून्या शॉर्टकटची नोंद नष्ट केली जाते.

८. ' Programs '  कॉम्प्युटरमध्ये असलेल्या सॉफ्टवेअरचे दालन :-
या विभागामध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या सॉफ्टवेअरची नोंद असते. तसेच नविन लोड केलेल्या सॉफ्टवेअरची नोंद देखिल याच विभागामध्ये शेवटी केली जाते.  येथे एखाद्या सॉफ्टवेअरच्या नावापूढे त्याचा उपविभाग उघडतो ज्यामध्ये त्या सॉफ्टवेअर संबंधी (म्हणजेच तो सुरु करायचा आहे का?, काढून टाकायच आहे का?, तसेच त्याची माहिती ई.) माहिती असते.
खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण दिले आहे.

१. ' My Documents '  माय डॉक्युमेंट्स  :- आपण कॉम्प्युटरमध्ये साठविलेल्या फाईल्स सर्वसाधारणपणे या फोल्डरमध्ये साठविण्याची आज्ञा कॉम्प्युटरला दिलेली असते. म्हणजेच जेव्हा आपण एखादी फाईल साठविण्यासाठी जातो तेव्हा शक्यतो कॉम्प्युटर प्रथम हा फोल्डर उघडतो.
२. ' My Computer '  माय कॉम्प्युटर  :- या विभागातून कॉम्प्युटरमधिल सर्व जागा पाहाता येतात (उदा. [C:],  [D:],  [E:], CD Drive ई.)  एखादी फाईल उघडण्यासाठी ती फाईल ज्या फोल्डरमध्ये ज्या जागी ठेवली असेल तिथे जाण्यासाठी या विभागाचा वापर केला जातो.
३. ' My Network Places '  माय नेटवर्क प्लेसेस  :- त्या कॉम्प्युटरला जोडलेल्या इतर कॉम्प्युटरची नोंद इथे मिळते, या विभागातून आपण त्या कॉम्प्युटरला जोडलेल्या इतर कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करु शकतो. या प्रकारामूळे एखादी फाईल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी लागणारा वेळ वाचतो, तसेच प्रिंटींग अथवा इंटरनेट एकत्रित जोडण्यासाठी याचा उपयोग होतो.
४. ' Recycle Bin '  रिसायकल बिन  :- याला कॉम्प्युटरमधिल कचर्‍याचा डब्बा असे म्हणतात.  कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही विभातून अथवा कोणत्याही फोल्डरमधून एखादी फाईल डिलिट केल्यास ती प्रथम या विभागामध्ये येते. एखादी डिलिट केलेली फाईल पून्हा हवी असल्यास याच विभागामध्ये त्या डिलिट केलेल्या फाईलला सिलेक्ट करुन ' Restore '  या बटणावर क्लिक केल्यास ती पून्हा मिळविता येते.
१. नविन फोल्डर कसे तयार करावे ?
विंडोजमध्ये कुठल्याही मोकळ्या ठिकाणी अथवा डेस्कटॉपवर एखादे फोल्डर बनवायचे असल्यास मोकळ्या जागी माऊसने ' राईट क्लिक ( Right Click ) ' करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील ' New > ' ह्या विभागावर माऊस नेल्यास येणार्‍या अजून एका चौकोनातील ' Folder ' ह्या विभागावर क्लिक केल्यास त्याजागी नविन फोल्डर तयार होते.
एखादे नविन फोल्डर तयार केल्यानंतर अथवा जून्या एखाद्या फोल्डरचे नाव बदलायचे असल्यास त्या फोल्डरवर पून्हा ' राईट क्लिक ( Right Click ) ' करुन ' Rename ' ह्या विभागावर क्लिक करावे व आपणास हवे असलेले नविन नाव द्यावे.

२. एखादी फाईल डिलिट कशी करावी ?
विंडोजमध्ये कुठल्याही फाईलला सिलेक्ट करुन कि-बोर्डवरील डिलिट बटण दाबल्यास कॉम्प्युटर ती फाईल आपणास डिलिट करायची म्हणजेच नष्ट करायची आहे का ? असे विचारतो त्या ठिकाणी ' Yes ' वर क्लिक केल्यास ती फाईल डिलिट होवून रिसायकल बिन ( Recycle Bin ) मध्ये जमा होते.
तसेच जर एखादी फाईल आपणास कायमची डिलिट करायची असेल म्हणजेच जी आपणास रिसायकल बिन मध्ये पण नको आहे तीला डिलिट करताना कि-बोर्डवरील  ' Shift '  चे बटण दाबून डिलिट बटण दाबल्यास कॉम्प्युटर ती फाईल कायमची डिलिट करतो.


No comments:

Post a Comment