आमची ओळख

My photo
बी.डी.डी वरळी, महाराष्ट्र, India

अधिक माहिती

Thursday, 9 June 2011

मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ओळख



वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, ऍक्सेस इ. सॉफ्टवेअर्स मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनविले असल्याने ते हाताळताना सोपे जावे यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या सर्व सॉफ्टवेअर्समध्ये एकसुत्रीपणा ठेवला आहे, म्हणजेच सर्व सॉफ्टवेअर्सची जडणघडण सारखीच बनविली आहे. तुम्ही जर सर्व सॉफ्टवेअर्स उघडून पाहिलीत तर त्यातील वरील बटणांची मांडणी सर्वांमध्ये सारखीच आढळेल. तसेच सर्व सॉफ्टवेअर्समध्ये अर्ध्याहून अधिक बटणे सारखीच असून त्याचे काम देखिल सारखेच आहे.
मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे सॉफ्टवेअर प्रामुख्याने गणिते आणि अकांऊंट करण्यासाठी करण्यासाठी वापरले जाते, म्हणूनच याची रचना वर्डपेक्षा थोडी निराळी आहे.
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्व बटणांची माहिती दिल्याने इथे मायक्रोसॉफ्ट एक्सेलची माहिती देताना त्यातील फक्त वर्डमध्ये माहिती न दिलेल्या आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलशी संबंधीत असलेल्या बटणांचीच माहिती दिली आहे.


खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण असलेल्या फाईलीची लिंक दिली आहे.

१. [ AutoSum ] ऑटो सम : - या विभागामध्ये गणितामधिल जवळपास सर्व समिकरणे आपोआप सोडविण्यासाठी सोय केली आहे. फक्त एखादे समिकरण सोडविण्याची प्रक्रिया आपणास माहित असणे आवश्यक आहे.
या बटणाच्या बाजूच्या बाणावर क्लिक केल्यास खाली येणार्‍या छोट्या चौकोनामध्ये सर्वसाधारणपणे लागणार्‍या  Sum, Average, Count, Max, Min  या गणितांसाठी शॉर्टकट दिली आहे, तर इतर अनेक प्रकारची समिकरणे सोडवण्यासाठी त्याच चौकोनामध्ये शेवटी More Functions...  असे बटण दिले आहे.
या बटणाद्वारे समिकरणे कशी सोडवायची ते पहाण्यासाठी इथे क्लिक करा.
२. [ Sort Ascending ] चढत्या क्रमाने मांडणी : - एखाद्या कॉलममधिल काही संख्या सिलेक्ट केल्यास व या बटणावर क्लिक केल्यास त्या संख्या चढत्या क्रमाने लागतात. तसेच जर एकपेक्षा जास्त कॉलममधिल काही संख्या सिलेक्ट करुन या बटणावर क्लिक केल्यास आपण ज्या कॉलमपासुन सिलेक्ट करुन सुरुवात केली असेल त्या कॉलमच्या संख्यांनुसार इतर कॉलमच्या संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली जाते.
३.  [ Sort Descending ] उतरत्या क्रमाने मांडणी : - एखाद्या कॉलममधिल काही संख्या सिलेक्ट केल्यास व या बटणावर क्लिक केल्यास त्या संख्या उतरत्या क्रमाने लागतात. तसेच जर एकपेक्षा जास्त कॉलममधिल काही संख्या सिलेक्ट करुन या बटणावर क्लिक केल्यास आपण ज्या कॉलमपासुन सिलेक्ट करुन सुरुवात केली असेल त्या कॉलमच्या संख्यांनुसार इतर कॉलमच्या संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी केली जाते.
४.  [ Chart Wizard ] आलेख किंवा तक्ता : - मायक्रोसॉफ्ट एल्सेलमध्ये दिलेल्या संख्यांपासून जर आपणास आलेख किंवा तक्ता काढायचा असल्यास या बटणाचा उपयोग होतो. हव्या असलेल्या संख्या निवडून या बटणावर क्लिक केल्यास येणार्‍या चौकोनामध्ये आपणास कोणत्याप्रकारचा आलेख हवा आहे ते निवडायचे. तिथे आपणास प्रामुख्याने वापरले जाणारे ' Column, Bar, Line, Pie '  या आलेखाच्या प्रकारांव्यतिरीक्त इतर अनेक प्राकारापैकी आपणास हव्या असलेल्या प्रकारावर क्लिक करुन त्याच चौकोनामधिल ' Finish '  बटणावर क्लिक केल्यास ताबडतोब तिथे तसा आलेख तयार होतो.
टिप : आलेख आणताना आपणास हव्या त्या स्वरुपात त्याला आणण्यासाठी खाली दिलेल्या
' Next > '  बटणावर क्लिक करत आपणास हव्या त्या गोष्टी त्या आलेखात निवडून घेतल्यास आपणास हवा असल्याप्रमाणे आलेख तयार होतो.


खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण असलेल्या फाईलीची लिंक दिली आहे.

५. [ Merge and Center ] मर्ज आणि सेंटर : - एकापेक्षा जास्त  Row  अथवा Column  मधिल  Cell  एकत्र करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.
या बटणाचा वापर करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
>> आपणास जे Cell  एकत्र करायचे आहेत ते ठरवा.
>> त्या सर्व Cell  ना सिलेक्ट करा.
>> आता वरील बटणांमधिल या बटणावर क्लिक करा. असे केल्याने ते सर्व Cell  एकत्र होतील.

६. [ Currency Style ] करन्सी स्टाईल : -  एक्सेलमध्ये असलेल्या संख्यांना चलनाचे स्वरुप देण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो. एक्सेलमध्ये संख्या असलेल्या Cell  सेलेक्ट करा आणि या बटणावर क्लिक करा. असे केल्याने त्या संख्यांच्या समोर अमेरीकेचे चलन असलेल्या डॉलरचे चिन्ह येते.
७. [ Percent Style ] टक्केवारी स्टाईल : -  एक्सेलमध्ये असलेल्या संख्यांना टक्केवारी स्टाईल देण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो. एक्सेलमध्ये संख्या असलेल्या Cell  सेलेक्ट करा आणि या बटणावर क्लिक करा. असे केल्याने त्या संख्यांच्या मागे  %  असे चिन्ह येते.
८. [ Comma Style ] टक्केवारी स्टाईल : -  कुठल्याही मोठ्या संख्यांना मोजण्यासाठी त्याच्यामध्ये विराम चिन्ह दिल्यास त्या लगेच मोजता येतात. यासाठीच एक्सेलमध्ये असलेल्या संख्यांना कॉमा म्हणजेच विराम चिन्ह देण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो. एक्सेलमध्ये संख्या असलेल्या Cell  सेलेक्ट करा आणि या बटणावर क्लिक करा. असे केल्याने त्या संख्यांच्या मध्ये तीनच्या क्रमाने प्रत्येक संख्येमागे विराम चिन्ह येते.
९. [ Increase Decimal ] संख्यांना दशांश देण्यासाठी : - एक्सेलमध्ये संख्यांना शेवटी दशांश चिन्ह देण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो. संख्या असलेल्या Cell  सेलेक्ट करुन या बटणावर क्लिक करा. असे केल्याने त्या संख्यांच्या मागे दशांश चिन्ह येईल. तसेच आपण जसजसे या बटणावर क्लिक कराल तसतसे त्याच्यामागे दशांश वाढत जातील.
१०. [ Decrease Decimal ] संख्यांना दशांश कमी करण्यासाठी : - एक्सेलमध्ये आपण काम करीत असलेल्या फाईलमध्ये काही ठिकाणी संख्यांना शेवटी दशांश असल्यास ते कमी करण्यासाठी अथवा घालविण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.  दशांश असलेल्या संख्या असलेले Cell  सेलेक्ट करुन या बटणावर क्लिक करा. असे केल्याने त्या संख्यांच्या मागे असलेले दशांश कमी होईल. तसेच आपण जसजसे या बटणावर क्लिक कराल तसतसे त्या संख्यांच्या मागिल दशांश कमी होत जातील.

खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण असलेल्या फाईलीची लिंक दिली आहे.

११. [ Name Box ] नेम बॉक्स : - एक्सेलमध्ये ऍक्टिव सेल ज्या Cell  मध्ये असेल त्या Cell  चे नाव या भागामध्ये दिसते. प्रत्येक Cell  चे नाव हे तो Cell  ज्या कॉलम आणि रो मध्ये आहे त्यावरुन ठरते. Cell  चे नाव प्रथम 'कॉलम' आणि मग 'रो' या क्रमाने ओळखले जाते.
१२. [ Formula Bar ] फॉर्मुला बार : - एक्सेलमध्ये एखाद्या गणिताचे समिकरण या भागामध्ये देता येते अथवा एक्सेलमध्ये केलेल्या सर्व गणितांचे समिकरण या भागामध्ये दिसते.
१३. [ Row ] रो बार : - एक्सेलमध्ये प्रत्येक Cell  निरनिराळ्या नावाने ओळखला जावा यासाठी त्यांची विभागणी उभ्या आणि आडव्या भागामध्ये केली आहे. त्यातील आडव्या रेषेतील भागांना 'रो' असे म्हणतात, तर वरील कॉलमच्या पट्टीला  'रो बार' असे म्हणतात.
१४. [ Column ] कॉलम बार : - एक्सेलमध्ये प्रत्येक Cell  निरनिराळ्या नावाने ओळखला जावा यासाठी त्यांची विभागणी उभ्या आणि आडव्या भागामध्ये केली आहे. त्यातील उभ्या रेषेतील भागांना 'कॉलम' असे म्हणतात, तर वरील कॉलमच्या पट्टीला 'कॉलम बार' असे म्हणतात.
१५. [ Active Cell ] ऍक्टिव सेल : - वर्ड मध्ये ज्याप्रमाणे कर्सर काम करतो त्याच प्रमाणे एक्सेलमध्ये 'ऍक्टिव सेल' काम करते. आपण टाईप केलेली गोष्ट फक्त त्याच Cell  मध्ये येते जेथे ऍक्टिव सेल असेल.
१६. [ Spreadsheets or Worksheet ] स्प्रेडशीट किंवा वर्कशीट : - एक्सेलमध्ये ज्याभागामध्ये काम केले जाते, म्हणजेच ज्या जागी सर्व काम केले जाते त्या जागेस स्प्रेडशीट किंवा वर्कशीट असे म्हणतात.

खाली दिलेल्या चित्रामध्ये निरनिराळ्याजागेस क्रमांक दिले आहेत. तर त्या चित्राच्या खाली त्या-त्या क्रमांकाचे स्पष्टीकरण असलेल्या फाईलीची लिंक दिली आहे.

१७. [ Sheet Tab ]  शीट टॅब : - मायक्रोसॉफ्ट एल्सेलमध्ये आपण ज्या पानावर म्हणजेच  'शीट'  वर काम करतो त्या Sheet  ला 'Sheet 1'  असे म्हणतात. एल्सेलमध्ये कुठल्याही फाईलमध्ये साधारणपणे तीन 'शीट'  आधीपासून असतात. जर आपण एखाद्या फाईलमध्ये अनेक 'शीट'  आणल्या असतील त्यावेळी पुढील अथवा मागिल 'शीट'  वर जाण्यासाठी या विभागाचा उपयोग होतो.
१८. [ Active Sheet ]  चालू शीट : - आपण ज्या एल्सेलमध्ये शीट काम करीत असाल ती शीट इथे उघडलेली दिसते.
१९. [ Additional Sheets ]  अधिक शीट : - इथे आपणास चालू फाईलमध्ये घेतलेल्या अधिक शीट दिसतात. साधारणपणे एका फाईलमध्ये फक्त तीन अधिक शीट असतात, त्याव्यतिरीक्त अधिक शीट हव्या असल्यास शेवटच्या शीटच्या नाववर माऊसने राईट क्लिक ( Right Click )  करुन  ' Insert ' वर केल्यास तेथे नविन शीट तयार होते, त्याच प्रमाणे कुठल्याही शीटच्या नाववर माऊसने राईट क्लिक करुन आपण तीचे नाव बदलू शकतो, त्याची जागा बदलू शकतो, त्याची डुप्लिकेट करु शकतो तसेच एखाद्या शीटला डिलिट करु शकतो.

संख्यांची बेरीज कशी करावी ?
१. ज्या संख्यांची बेरीज करायची आहे त्यांचे उत्तर आपणास जेथे हवे असेल त्या Cell  मध्ये क्लिक करा.
२. वरील बटणांमधिल  ' ऑटो सम ' ( AutoSum )  या बटणावर क्लिक करा. आपणास वरील संख्या आपोआप सिलेक्ट झालेल्या दिसतील, जर त्या संख्या दुसरीकडे असल्यास त्यांना स्वतःहून सिलेक्ट करा.
३. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास त्याचे उत्तर खाली आलेले दिसेल.

दोन संख्यांमध्ये वजाबा़की, बेरीज, गुणाकार अथवा भागाकार कसा करावा ?
१. सर्वप्रथम आपणास त्या दोन संख्यांचे उत्तर जेथे हवे असेल त्या Cell  मध्ये क्लिक करा.
२. आता ज्या Cell  मध्ये उत्तर हवे असेल त्यामध्ये ' = '  (बरोबरचे चिन्ह) टाईप करा.
३. आता पहिली संख्या ज्या Cell  मध्ये असेल त्या Cell  वर क्लिक करा.
४. आता ज्या Cell  मध्ये उत्तर हवे असेल त्यामध्ये पहिली संख्या असलेल्या Cell  चा क्रमांक येईल. त्याच्या पूढे आपणास जर वजाबाकी करायची असल्यास ' - '  चे चिन्ह टाईप करा.

( बेरीज करण्यसाठी ' + ' , वजाबाकी करण्यसाठी ' - ' , गुणाकार करण्यसाठी ' * '  आणि भागाकार करण्यसाठी ' / '  हे चिन्ह वापरा )
५. आता दुसरी संख्या ज्या Cell  मध्ये असेल त्या Cell  वर क्लिक करा.
६. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास त्याचे उत्तर खाली आलेले दिसेल.
वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच बेरीज करण्यसाठी ' + ' , वजाबाकी करण्यसाठी ' - ' , गुणाकार करण्यसाठी ' * '  आणि भागाकार करण्यसाठी ' / '  हे चिन्ह वापरा 

अनेक संख्यांची सरासरी कशी काढावी ?
१. सर्वप्रथम आपणास उत्तर जेथे हवे असेल त्या Cell  मध्ये क्लिक करा.
२. वरील बटणांमध्ये ' ऑटो सम '  ( AutoSum ) या बटणाच्या बाजूच्या बाणावर क्लिक करा.
३. आता त्यातील ' ऍव्हरेज ' ( Average ) म्हणजेच 'सरासरी' या बटणाच्या बाजूच्या बाणावर क्लिक करा. आपणास वरील संख्या आपोआप सिलेक्ट झालेल्या दिसतील, जर त्या संख्या दुसरीकडे असल्यास त्यांना स्वतःहून सिलेक्ट करा.
४. आता कि-बोर्डवरील एंटरचे बटण दाबा. आपणास त्याचे उत्तर खाली आलेले दिसेल.
वर दिलेल्या उदाहरणाद्वारेच ' एकुण संख्या ' ( Count ), ' सर्वात मोठी संख्या ' ( Max ), ' सर्वात लहान संख्या ' ( Min ) ही गणिते करु शकतो.



1 comment: